MS Dhoni Fine : आयपीएल २०२६ पूर्वी एमएस धोनीवर रांचीत दंडात्मक कारवाई! काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या
MS Dhoni Fine : धोनीला वेगवान गाड्या आणि ड्रायव्हिंगची आवड सर्वश्रुत असल्याने, या किरकोळ दंडाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

MS Dhoni fine for speed limit violation in Ranchi : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ ची तयारी करण्यासाठी धोनी चेन्नईत दाखल झाला असतानाच, त्याच्या मूळ गावी म्हणजेच रांचीमध्ये त्याच्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय? MS Dhoni Fine
रांची शहरातील स्वयंचलित वाहतूक देखरेख यंत्रणेने धोनीच्या कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे नोंदवले आहे. ही घटना धोनीच्या निवासस्थानाजवळ घडली असून, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८३ अंतर्गत त्याच्यावर १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. धोनीला वेगवान गाड्या आणि ड्रायव्हिंगची आवड सर्वश्रुत असल्याने, या किरकोळ दंडाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
नोटीस आणि जुन्या घराचा वाद – MS Dhoni Fine
दंडाच्या कारवाईसोबतच धोनीला (MS Dhoni) झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाकडूनही एक नोटीस बजावण्यात आली आहे. रांचीमधील हामरू रोडवरील त्याच्या जुन्या निवासी जागेचा वापर व्यावसायिक कामांसाठी केला जात असल्याचा संशय मंडळाने व्यक्त केला असून, त्याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
ट्रैफिक नियम तोड़ने पर MS धोनी की कार का 1000 रुपए का कटा चालान
झारखंड में रांची की सड़क पर MS Dhoni की मर्सेडीज कार 90 किमी/घंटा की रफ्तार से चल रही थी, जबकि अधिकतम गति 60 किमी/घंटा थी. इसके कारण कार का 1000 रुपए का चालान कट गया.#ViralNews #ViralPost #MSDhoni #RanchiTraffic… pic.twitter.com/LN5v7rt2aw
— Prabhat Khabar (@prabhatkhabar) March 5, 2026
IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचे सराव शिबीर सुरू – MS Dhoni Fine
दुसरीकडे, धोनी आगामी आयपीएल(IPL) हंगामासाठी सज्ज झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सराव शिबिरात सहभागी होण्यासाठी तो नुकताच चेन्नईत पोहोचला आहे. या हंगामासाठी चेन्नईने त्याला अवघ्या ४ कोटी रुपयांमध्ये (अनकॅप्ड श्रेणी) कायम (Retain) केले आहे.
सॅमसनची एन्ट्री आणि धोनीची भूमिका –
चेन्नईने लिलावापूर्वीच राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला ट्रेडद्वारे संघात घेतले आहे. ४४ वर्षीय धोनी सर्व सामने खेळणार की नाही, याबाबत साशंकता असल्याने सॅमसन यंदा यष्टिरक्षणाची मुख्य जबाबदारी पार पाडू शकतो. गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे धोनीने नेतृत्व केले होते, परंतु संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिला होता. यंदा ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.





