MP Monsoon Update : मान्सुन १५ जूनला मध्यप्रदेशात येणार

MP Monsoon Update – नैऋत्य मान्सून येत्या १५ जून पर्यंत मध्य प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. गेल्यावर्षी २५ जूनला मान्सुन मध्यप्रदेशात दाखल झाला होता, पण त्या तुलनेत यंदा लवकरच त्याचे मध्यप्रदेशात आगमन होण्याची चिन्हे आहेत.
सध्या मान्सुन केरळात आणि ईशान्य भागात पोहचला आहे. केरळ आणि ईशान्येत एकाच वेळी मान्सूनची सुरुवात होणे अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. यापूर्वी २०१७, १९९७, १९९५ आणि १९९१ मध्ये चार वेळा असे घडले आहे.
पीटीआयशी बोलताना, भारतीय हवामान विभागाचे भोपाळ केंद्राचे हवामानशास्त्रज्ञ प्रमेंद्र कुमार म्हणाले, की, मान्सून १५ जूनच्या आसपास किंवा त्याच्या सामान्य वेळापत्रकाच्या एक किंवा दोन दिवस आधी मध्य प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे.
तसेच या हंगामात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, असे सांगून ते म्हणाले की, राज्याचा सरासरी पाऊस ९४९ मि.मी.इतका असतो.





