फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारे टॉप-5 स्मार्टफोन्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये; फीचर्स खूपच जबरदस्त

Best Smartphones Under 30000 | चांगल्या फीचर्ससह येणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास तुम्हाला थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतात. भारतीय बाजारात 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे अनेक शानदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. या बजेटमध्ये तुम्ही फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारे फोन खरेदी करू शकता. सध्याच्या काळात जास्त वेळ टिकणाऱ्या बॅटरीसह येणारा स्मार्टफोन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या अशाच काही शानदार स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
OnePlus Nord 4
OnePlus Nord 4 ची किंमत 28,999 रुपये आहे. यामध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले, 16MP चा फ्रंट कॅमेरा, 50 MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच, स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 3 चिपसेटचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये 100W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येणारी 5,500mAh ची बॅटरी दिली आहे.
Realme GT 6T
Realme GT 6T ची किंमत 27,999 रुपये आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 चिपसेट, बिल्ट-इन 5,500mAh बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग, 6.78-इंच 8T LTPO AMOLED पॅनेल दिला आहे. तसेच, 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
POCO X7 Pro
POCO X7 Pro मध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 6,550mAh बॅटरी दिली आहे. फोन अवघ्या 1 तासात चार्ज होतो. ‘टॉप स्पीड’ मोडद्वारे चार्जिंग खूप लवकर होते. या फोनला तुम्ही फक्त 25,999 रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
POCO F6
पोकोच्या या फोनमध्ये 90W टर्बो चार्जिंग सपोर्टसह येणारी 5000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 SoC, 6.67-इंच क्रिस्टल रेस फ्लो AMOLED पॅनेल, 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पोकोच्या या फोनची किंमत 29,990 रुपये आहे.
Motorola Edge 50 Pro
मोटोरोलाच्या या फोनची किंमत 29,999 रुपये आहे. यामध्ये 125 व्हॅट टर्बोपॉवर चार्जिंग सपोर्टसह येणारी 4500 एमएएच बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यानंतर बॅटरी 40 तासांपर्यंत टिकू शकते. यात 6.7-इंचाचा पॉलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 7 जनरल 3 SoC सह 12 जीबीपर्यंत रॅम, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.





