फक्त 6,999 रुपयात मोटोरोलाचा शानदार स्मार्टफोन लाँच, 50MP कॅमेरा-12GB रॅमसह मिळेल बरचं काही

Moto G05 Launched: मोटोरोलाने भारतीय बाजारात नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Moto G05 हा फोन भारतीय ग्राहकांसाठी आणला असून, हा Moto G04 चा सक्सेसर आहे. कंपनीने या फोनला खूपच कमी किंमतीत लाँच केले आहे. याशिवाय, यामध्ये 5200mAh ची बॅटरी, 50MP चा कॅमेरा सारखे अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. या फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Moto G05 ची किंमत
कंपनीने Moto G05 ला केवळ एकमेव 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. हा फोन प्लम रेड आणि फॉरेस्ट ग्रीन या दोन रंगात येतो. दोन्हीमध्ये विगेन लेदरचे फिनिशिंग दिले आहे. या फोनला ग्राहक ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून 13 जानेवारीपासून खरेदी करू शकतात.
Moto G05 चे फीचर्स
Moto G05 स्मार्टफोन 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1000 निट्स ब्राइटनेस, गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह 6.67 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आहे. मोटोचा हा फोन मीडियाटेक हेलियो जी81 एक्सट्रीम प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 4 जीबी रॅम दिली आहे. याशिवाय, 8 जीबी व्हर्च्युअल रॅमचा देखील सपोर्ट मिळतो. म्हणजेच, यूजर्स 12जीबीपर्यंत रॅम वाढवू शकतात.
फोनमध्ये पोट्रेड मोड आणि ऑटो नाइट व्हिजन फीचर्स 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5200mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये फोनची बॅटरी 2 दिवस टिकेल.
इतर फीचर्सबद्दल सांगायचे तर मोटोचा हा फोन अँड्राइड 15 वर काम करतो. यात दोन वर्ष सिक्युरिटी अपडेट मिळतील. तसेच, धुळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी आयपी52 रेटिंग दिले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी एक यूएसपी टाइप-सी पोर्ट मिळेल.





