Motilal Oswal Trophy (Snooker) : खुल्या गटात ‘पिनाक’ तर ज्युनिअर गटात ‘आरव’ ठरला विजेता…

पुणे – डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या पिनाक आनप याने खुल्या गटाचे तर, १३ वर्षीय आरव संचेती याने ज्युनिअर गटाचे विजेतेपद संपादन केले.
अंतिम फेरीत पिनाक आनप याने आनंद रघुवंशी याचा ४-१ असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. राष्ट्रीय स्पर्धेतील हे पिनाकचे पहिलेच विजेतेपद ठरले. ज्युनिअर गटामध्ये पुण्याचा आणि महाराष्ट्र सब-ज्युनिअर (१८ वर्षाखालील) स्नुकर विजेतेपद मिळवणारा आरव संचेती याने आयान खान याचा २६-१५, ६१(६१)-००, ५६-०१ असा सहज पराभव करून विजेतेपद संपादन केले. जुलै २०२२ मध्ये मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर (१८ वर्षाखालील) स्नुकर गटाचे विजेतेपद मिळवले होते. तसेच जुलै २०२२ मध्ये झालेल्या आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२३ स्पर्धेत आरव याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोतीलाल ओस्वाल प्रायव्हेट वेल्थचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शंकर आणि माजी वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेट खेळाडू निलीमा जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डेक्कन जिमखाना क्लबचे बिलीयर्डस् विभागाचे सचिव विजय कदम, समर खंडेलवाल, सहभागी खेळाडू आणि क्लबच्या बिलीयर्डस् विभागाचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.




