Crime News : आईचे अनैतिक संबध; अल्पवयीन मुलाला राग अनावर; तिच्या प्रियकराला संपवलं, दौंड हादरलं…

Crime News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराची हत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुरूवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रविण दत्तात्रय पवार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
प्रविणचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब महिलेच्या मुलाला खटकत होती. यातूनच त्याची हत्या अल्पवयीनाकडून झाली आहे. अल्पवयीन मुलामध्ये आणि प्रविण यांच्यात अनेकदा वाद झाले होते. वारंवार ही गोष्ट अल्पवयीन मुलाने प्रवीणला सांगूनही तो ऐकत नसल्याने या गोष्टीचा राग मनात धरून त्याने त्याची हत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंडमधील इंदिरानगरमधअये प्रवीण पवाराची हत्या करण्यात आली आहे. गुरूवारी मध्यरात्री प्रविण या भागात आला होता. त्याच घर याच भागात आहे. यावेळी अल्पवयीन मुलासोबत त्याचा वाद झाला. यावेळी अल्पवयीने मुलाने कोयत्याने प्रविण पवारवर सपासप वार केले. हे वार इतके तीक्ष्ण होते की त्याच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अल्वपयीन मुलाला ताब्यात घेतल असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : ट्रम्प-पुतिन यांच्यात तीन तास चर्चा; रशिया-युक्रेन युद्ध प्रकरणाबाबत हाती निराशाच?





