ट्रम्प-पुतिन यांच्यात तीन तास चर्चा; रशिया-युक्रेन युद्ध प्रकरणाबाबत हाती निराशाच?

Trump-Putin Alaska Meeting | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शुक्रवारी (15 ऑगस्ट 2025) आलास्कामध्ये भेट झाली. या भेटीनंतर पुतिन म्हणाले की, जर डोनाल्ड ट्रम्प 2022 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये असते, तर युक्रेनमध्ये युद्ध कधीच झाले नसते. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे आशेचे संकेत दिले.
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांनी अलास्कामध्ये चर्चा केली. ही चर्चा सुमारे 3 तास चालली आणि त्यात प्रामुख्याने रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. ट्रम्प बऱ्याच काळापासून असा दावा करत आहेत की, जर ते राष्ट्राध्यक्ष असते, तर युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध झाले नसते. याबाबत जेव्हा पुतिन यांना विचारले गेले, तेव्हा ‘मी याची पुष्टी करू शकतो’, असे पुतिन यांनी सांगितले. Trump-Putin Alaska Meeting |
पुतिन म्हणाले की, मॉस्को आणि वॉशिंग्टन यांनी संबंधांच्या अत्यंत कठीण कालखंडानंतर आता खूप चांगले संपर्क प्रस्थापित केले आहेत. परिस्थिती सुधारणे आवश्यक होते. आम्ही नेहमी लक्षात ठेवू की आम्ही शत्रूंच्या विरोधात कसे लढत होतो. ही परंपरा भविष्यात आमच्या कामी येईल.” Trump-Putin Alaska Meeting |
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सकारात्मक केली. त्यांनी ही बैठक अत्यंत फलदायी असल्याचे सांगत अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचे नमूद केले. मात्र, ट्रम्प यांनी अनेक मोठे मुद्दे अद्यापही प्रलंबित असल्याचे देखील मान्य केले. Trump-Putin Alaska Meeting |
ट्रम्प यांच्याशी सहमत
पुतिन म्हणाले की, ‘या भेटीत युक्रेन हा मुख्य मुद्दा होता. सर्व मूळ कारणे दूर केली पाहिजेत आणि रशियाच्या सर्व चिंतांचा विचार केला पाहिजे. मी ट्रम्प यांच्याशी सहमत आहे की युक्रेनची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. मला आशा आहे की परस्पर समजुतीने युक्रेनमध्ये शांती प्रस्थापित होईल.’ परंतु चर्चेतून कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, अलास्काच्या अँकरेज येथे झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्धावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी करार होण्यापासून रोखणारी एक गोष्ट होती, असे सांगितले. पण, कोणत्या गोष्टीमुळे करार होऊ शकला नाही हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
मनोरंजक किस्सा
पत्रकार परिषदेत एक मनोरंजक किस्सा घडला. ट्रम्प यांनी पुतिनला “लवकरच भेटू” असे म्हटले. त्यावर पुतिन यांनी इंग्रजीत उत्तर दिले “नेक्स्ट टाइम इन मॉस्को” (पुढील चर्चा मॉस्कोमध्ये होईल) यावर ट्रम्प यांनी “ओह, दॅट्स अॅन इंटरेस्टिंग वन” (वा, हे तर मनोरंजक आहे) असे हसत उत्तर दिले. Trump-Putin Alaska Meeting |
हेही वाचा :
“एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे”; नाईकांचा खोचक टोला





