Twinkle Khanna : बॅालिवूड अभिनेता अक्षय कुमार चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. मात्र, त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना चित्रपटात दिसत नाही. अक्षयसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने आपला सिनेप्रवास थांबवला आणि मोर्चा लेखनाकडे वळवला. तिने लिहिलेली काही पुस्तके खूप लोकप्रिय झाली आहेत. अनेकांची ती आवडती लेखिका झाली आहे. ट्विंकने १९९५ मध्ये बरसात या चित्रपटातून बॅालिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले. तिने तिच्या फिल्मी कारकीर्दीत केवळ १७ चित्रपट केले. यामधील जवळपास सगळेच चित्रपट हिट ठरले. २००१ मध्ये ट्विंकलने अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्न करण्याअगोदर ट्विंकलची आई डिंपल कपाडिया हिने एक अट ठेवली होती. डिंपल यांनी दोघांना लग्नापूर्वी काही काळ एकत्र राहण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून एकमेकांना नीट समजून घेता येईल. ही अट २००१ मध्ये पूर्ण झाली आणि त्यानंतरच ट्विंकल आणि अक्षय कुमार विवाहबंधनात अडकले. ट्विंकने तिच्या ५१ व्या वाढदिवसाच्या दिवशी हा खुलासा केला आहे. ट्विंकल खन्ना दोन मुलांची आई असून ती आपल्या स्पष्ट मतांमुळे, सामाजिक विषयांवरील लेखनामुळे आणि वेगळ्या विचारसरणीमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनय सोडल्यानंतर ट्विंकल खन्नाने लेखनाकडे आपला मोर्चा वळवला. ती एक यशस्वी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे. तिची Mrs Funnybones, The Legend of Lakshmi Prasad आणि Pyjamas Are Forgiving ही पुस्तके वाचकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. याशिवाय ती एक उत्तम स्तंभलेखक म्हणूनही ओळखली जाते. हेही वाचा : कुलदीप सिंग सेंगरच्या शिक्षेला स्थगितीनंतर पीडित कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर ; वाचा काय म्हणाले ?