बॅड्स अॅाफ बॅालिवूड वेबसिरीजमधील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बॅार्डर 2 मध्ये झळकणार?

Border 2 movie : १९९७ च्या कल्ट क्लासिक ठरलेल्या ‘बॉर्डर’ सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉर्डर २ हा सिनेमा आधीच चर्चेत आहे आणि आता या बहुप्रतिक्षित सिनेमाविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे. सनी देओल अभिनीत या आगामी सिनेमात वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार काम करणार आहेत हे अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. आता या सिनेमात आणखी एका कलाकाराची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तानुसार, अभिनेत्री अन्या सिंह या सिनेमाचा भाग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अन्या या सिनेमात अहान शेट्टीसोबत झळकेल अशी माहिती आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अभिनेत्री अन्या सिंगने २०१७ मध्ये ‘कैदी बँड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक सिनेमे आणि वेबसिरीजमध्ये काम केले आहे.
नुकत्याच आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड‘ या वेबसिरीजमध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. जर अन्याला बॉर्डर २ मध्ये कास्ट केले गेले तर तो तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट असणार आहे. बॉर्डर २ हा सिनेमा अनुराग सिंग दिग्दर्शित करत आहेत.
या सिनेमात सनी देओल वरुण धवनसोबत त्याच्या प्रतिष्ठित भूमिकेत परतणार आहे. हा सिनेमा २२ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असून, काही सीन्स चित्रित करण्याचे बाकी आहेत.
हेही वाचा : “पागल है क्या?”, पापाराझींवर अभिनेते मनोज बाजपेयी संतापले





