Indrayani River : इंद्रायणी नदीवरील चिखली-मोई पूल वाहतुकीसाठी बंद; गावांना जोडणारा संपर्क तात्पुरता तुटला
Indrayani River : मुसळधार पावसामुळे पाणी पुलावरून वाहण्याची शक्यता

चिंबळी – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील मोई आणि हवेली तालुक्यातील चिखली गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीवर बांधलेल्या पुलावरील नाले कचऱ्यामुळे तुंबले आहेत. त्यामुळे पुलावरून पाणी वाहण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा (Indrayani River)
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नाले तुंबल्याने पाणी अडकून पडले असून ते पुलाच्या वर येण्याची भीती आहे. कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने धाव घेत पुलावरील वाहतूक थांबवली आहे. नागरिकांना या मार्गावरून प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Indrayani River : इंद्रायणी नदीवरील चिखली-मोई पूल वाहतुकीसाठी बंद; गावांना जोडणारा संपर्क तात्पुरता तुटला
वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली (Indrayani River)
हा पूल बंद झाल्यामुळे चिखली आणि मोई गावांना जोडणारा संपर्क तात्पुरता तुटला आहे. नोकरदार आणि ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक इतर पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे. पाऊस ओसरल्यानंतर आणि पुलाची पाहणी केल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा:
Silver Rate Fall: चांदी अचानक ‘इतकी’ झाली स्वस्त ; आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या





