Nepal Monsoon: नेपाळमध्ये मान्सूनचा कहर ! सामान्य जनजीवन विस्कळीत; आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

Nepal Monsoon – नेपाळमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधारपावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत किमान २०० जणांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू खोऱ्यात तीन, कोशी प्रांतात २७ आणि मधेश प्रांतात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
त्याचप्रमाणे पूर आणि भूस्खलनामुळे बागमती प्रांतात ३४ आणि गंडकी प्रांतात ५६ जणांचा मृत्यू झाला आहे, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सुदूरपश्चिम प्रांतात १५, कर्नाली प्रांतात १३ आणि लुंबिनी प्रांतात ३७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन महिन्यात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये किमान २४१ जण जखमी झाले आहेत. पुरामध्ये किमान ४९ जण वाहून गेले आहेत. या लोकांचा सुरक्षा दलांकडून शोध घेतला जातो आहे. संततधार पावसामुळे ३८४ घरांचे नुकसान झाले आहे आणि ५ हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.





