Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी यांचे मुस्लिम देशांना पत्र केले ‘हे’ मोठे आवाहन
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांनी रविवारी मुस्लिम देशांना एक पत्र पाठवून खऱ्या शत्रूला ओळखण्याचे आणि अमेरिका-इस्रायलविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.

Mojtaba Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांनी रविवारी मुस्लिम देशांना एक पत्र पाठवून खऱ्या शत्रूला ओळखण्याचे आणि अमेरिका-इस्रायलविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. इराणविरुद्धचे युद्ध सुरू झाल्याच्या सहा महिन्यांनंतर मोजतबा खामेनी यांचे लेखी पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
युद्धाला सुरुवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी खामेनी (Mojtaba Khamenei) यांचे वडील अली खामेनी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाले होते. त्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनी यांची नियुक्ती झाली आहे. मात्र तेंव्हापासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत. त्यांचा कोणताही ऑडिओ किंवा व्हिडीओ संदेश देखील प्रसिद्ध झालेला नाही.
इस्लामिक देशांच्या समस्येवरचे एकच उत्तर असू शकते, ते म्हणजे या देशांची मैत्री आणि चांगल्यासाठी एकमेकांना केले जाणारे सहकार्य आहे. कोणत्याही पदावर असलेल्या कोणाच्याही कामामुळे जर मुस्लिम देशांमध्ये फूट पाडली जात असेल, आणि मुस्लिमांमध्ये जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणी, भेद निर्माण होत असतील, तर त्यामुळे अमेरिकेचा हेतू साध्य होतो आहे.
अमेरिका आणि इस्रायलचा उल्लेख करत तुमच्या खऱ्या शत्रूला ओळखा, त्याची योजना समजून घ्या आणि त्याचा सामना करा असे आवाहन मोजतबा खामेनी यांनी प्रादेशिक देशांच्या शासकांना केले. अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या युद्धादरम्यान इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन, कुवेत, कतार आणि बहरीनसह मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले होते.
त्यामुळे हे देश इराणविरुद्ध झाले आहेत. तसेच इराणी अधिकारी आणि नागरिकांना मतभेद बाजूला ठेवून इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन देखील खामेनी (Mojtaba Khamenei) यांनी केले.






