Trump on Hormuz: “होर्मुज आता अमेरिकेचा…” ; ट्रम्प यांच्या दाव्याने इराणचा संताप अनावर
Trump on Hormuz: मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला.

Trump on Hormuz: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीला अमेरिकेचा नवीन भूभाग म्हणून घोषित केले आहे. तर दुसरीकडे,, हा सागरी मार्ग बंद आहे आणि जोपर्यंत वॉशिंग्टन आपली भूमिका बदलत नाही तोपर्यंत तो बंदच राहील” असा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच फोटो सर्वप्रथम १८ ऑगस्ट रोजी शेअर केला होता. १४ ऑगस्ट रोजी लाँग आयलंड याठिकाणी एका पोलीस अकादमीत बोलताना त्यांनी, “लवकरच मी होर्मुझच्या सामुद्रधुनीला अमेरिकेचा भूभाग म्हणून घोषित करेन.” असे म्हटले होते.
दरम्यान, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी याविषयी, “जोपर्यंत अमेरिका आपली आश्वासने पूर्ण करत नाही आणि आपले वर्तन बदलत नाही, तोपर्यंत तेहरान ही सामुद्रधुनी उघडणार नाही.” असे म्हटले आहे.
इराण इंटरनॅशनलने रझाई यांच्या हवाल्याने, “होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे आणि ती पुन्हा उघडली जाणार नाही.” म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, जर अमेरिकेने आपले वर्तन बदलले आणि आपली आश्वासने पूर्ण केली, तर परिस्थिती वेगळी असेल, परंतु यावेळी अमेरिकेला कृती करावी लागेल. केवळ चर्चा आणि वाटाघाटींमधून हा प्रश्न सुटू शकत नाही” असेही त्यांनी म्हटले आहे.
होर्मुझमधून होणाऱ्या वाहतुकीत वाढ Trump on Hormuz:
न्यूयॉर्क पोस्टमधील एका अहवालानुसार, यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, इराणच्या घोषणेनंतरही, गेल्या काही दिवसांत या जलमार्गातून होणारी वाहतूक वाढली आहे.
गेल्या आठवड्यात, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जवळपास २०० जहाजांनी प्रवास केला, तर त्याच्या आधीच्या आठवड्यात हा आकडा सुमारे १५० आणि त्यापूर्वीच्या दोन आठवड्यांत सुमारे ४० होता.
केप्लर (Kpler) या सागरी माहिती कंपनीने म्हटले आहे की, गेल्या दोन आठवड्यांत सामुद्रधुनीतून जाणाऱ्या द्रवरूप मालापैकी ८० टक्क्यांहून अधिक माल एकतर ओमानमार्गे गेला, ज्याला अमेरिकेचा पाठिंबा आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेची मान्यता आहे, किंवा तो ‘डार्क’ (अज्ञात) जहाजांमार्फत गेला. रझाई यांनी असेही सांगितले की, इराणने सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका मध्यम मार्गावर ओमानसोबत करार केला आहे, तथापि अद्याप कोणतेही संयुक्त निवेदन अंतिम झालेले नाही.






