Donald Trump : कॅनडाच्या वाहनांवर 50 टक्के आयात शुल्क लावणार; ट्रम्प यांच्याकडून नवी धमकी
कॅनडाच्या वाहनांवर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिली आहे. कॅनडातील वाहने, कारचे सुटे भाग आणि स्टीलवर पुढील वर्षापासून हे आयात शुल्क लावले जाणार आहे.

Donald Trump : कॅनडाच्या वाहनांवर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिली आहे. कॅनडातील वाहने, कारचे सुटे भाग आणि स्टीलवर पुढील वर्षापासून हे आयात शुल्क लावले जाणार आहे. कॅनडाबरोबरचे व्यापारी संबंध आणखी बिघडू लागल्याचे हे निदर्शक आहे. कॅनडाबरोबरची व्यापारी चर्चा फिसकटल्यानंतर ट्रम्प यांनी वाहन उत्पादनांवरील नवीन आयात शुल्काची घोषणा केली.
कॅनडा अनेक वर्षांपासून अमेरिकेची फसवणूक करत आहे, असे ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी सकाळी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकन शेतकऱ्यांवर कॅनडाने लावलेल्या हास्यास्पद उच्च शुल्कांवर ट्रम्प यांनी टीका केली. हे उच्च आयात शुल्क टिकण्यासारखे नाही, आणि आता तर हे आयात शुल्क अजिबात टिकणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
कॅनडातील ओन्टारिओ प्रांताचे पंतप्रधान डॉग फोर्ड यांनी जनतेला वीज आणि दुर्मिळ खनिजांवर अवलंबून राहू नये, असे आवाहन केले आहे. तर देशाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेच्या आयात शुल्काला सामोरे जाण्यासकॅनडा तयार असल्याचे म्हटले आहे.
चर्चा फिसकटल्यानंतर कॅनडातल्या विविध उत्पादनांवरील वाढील आयात शुल्काची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या (Donald Trump) या वाढील आयात शुल्काला डॉलरमागे डॉलर अशा प्रमाणात आयात शुल्काने प्रत्युत्तर देण्याची घोषणा कॅनडाने देखील केली आहे.






