Mohan Bhagwat : मोहन भागवत थोडक्यात बचावले.! प्रवास करत असलेल्या ट्रेनवर केली दगडफेक
ट्रेन स्टेशनवर पोहोचताच सुरक्षा बंदोबस्त अजून मजबूत करण्यात आला. अधिकाऱ्यांनी कोचच्या आत जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

Mohan Bhagwat : लखनौवरुन नवी दिल्लीला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका कोचवर दगडफेक झाल्याची घटना समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार संध्याकाळची आहे.
या दगडफेकीत ज्या कोचची काच फुटली, त्या कोचमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत होते. भागवत यांना सध्या झेड सिक्युरिटी देण्यात आलेली आहे.
ही ट्रेन मक्खनपुर आणि फिरोजाबाद रेल्वे स्टेशन दरम्यान असताना, शताब्दी एक्सप्रेसवर बाहेरुन कोणीतरी दगडफेक केली. हा दगड एग्जीक्यूटिव क्लासच्या कोच ई-1 ला लागला. खिडकीची काच तुटली. (Mohan Bhagwat )
ही घटना अचानक घडली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले. मोहन भागवत त्याच कोचमध्ये होते. पण ते खिडकीपासून लांब बसले होते. ते सुरक्षित आहेत.
ट्रेन स्टाफने लगेच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. टूंडला जंक्शनवर रेल्वे सुरक्षा बल, राजकीय रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर होतं.
ट्रेन स्टेशनवर पोहोचताच सुरक्षा बंदोबस्त अजून मजबूत करण्यात आला. अधिकाऱ्यांनी कोचच्या आत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. (Mohan Bhagwat)
सुरक्षा कारणांमुळे मोहन भागवत यांना ट्रेनमधून खाली उतरु दिलं नाही. आवश्यक चौकशी आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ट्रेनला निर्धारित वेळेपेक्षा थोड्या उशिराने नवी दिल्लीसाठी रवाना केलं. (Mohan Bhagwat )
या घटनेनंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त टीम्सनी संबंधित रेल्वे स्थानकाच्या आसपास चौकशी सुरु केली आहे. आसपासच्या परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती गोळा केली जात आहे.






