Mohammed Siraj Denies Relationship Rumors With Mahira Sharma : आयपीएल २०२५ च्या हंगामाला २२ मार्च पासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, क्रिकेटपटू मोहम्मद सिराज त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिराजचे नाव अभिनेत्री आणि बिग बॉस १३ ची स्पर्धक माहिरा शर्माशी जोडले जात आहे. माहिरा आणि तिच्या आईने वारंवार हे दावे नाकारले आहेत, परंतु अटकळ थांबण्याचे नाव घेत नाही.
पापाराझींनी माहिरा शर्माला केले हैराण –
दरम्यान, गुरुवारी माहिरा मुंबईत एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती, तेव्हा तेथील पापाराझींनी तिला आयपीएल आणि तिच्या आवडत्या संघाबद्दल विचारुन हैरान केले. पापाराझी तिला वारंवार त्याच्या आवडत्या आयपीएल संघाबद्दल विचारून डिवचण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेचच, सिराजने फोटोग्राफर्सना त्याच्याबद्दल प्रश्न विचारू नका अशी विनंती केली. परंतु, त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही.
#MahiraSharma looking gorgeous in saree #bollywoodactress #encounterbollywood #BhoothBangla #SkyForce #AkshayKumar pic.twitter.com/lryaeFKjBt
— Encounter India (@Encounter_India) March 21, 2025
माहिरा आणि पापाराझीमध्ये काय घडले?
कार्यक्रमादरम्यान माहिरा रेड कार्पेटवर येताच फोटोग्राफर्सनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला, ‘आयपीएल सुरू होत आहे.’ माहिरा जी, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? तुम्ही कोणत्या संघाला पाठिंबा देत आहात? तुमचा आवडता संघ कोणता आहे?पापाराझी इथेच थांबले नाहीत. जेव्हा माहिराने उत्तर देणे टाळले तेव्हा पापाराझींनी गंमतीने सुचवले, ‘मॅडम, तुमचा आवडता संघ गुजरात.’ माहिरा जी, ओन्ली गुजरात.’ माहिराने कोणतेही उत्तर दिले नाही आणि ती सतत हसत होती.
सिराजने पापाराझींना केली विनंती –
Mohammed Siraj isn’t happy with paparazzi shouting his name to Bigg Boss star Mahira Sharma! He shuts down the dating rumours straight away.#MohammedSiraj #MahiraSharma #IPL2025 #CricketNews #CricketTwitter pic.twitter.com/DrLV28fHGs
— KOTH Gaming (@KOTHGaming_) March 21, 2025
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा भाग आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘मी पापाराझींना विनंती करतो की त्यांनी माझ्याबद्दल प्रश्न विचारणे थांबवावे. हे पूर्णपणे असत्य आणि निराधार आहे. मला आशा आहे की ते संपेल. यासोबतच त्याने हात जोडल्याचा इमोजी देखील शेअर केला आहे. मात्र, ही स्टोरी आता उपलब्ध नाही. कारण सिराजने पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांतच ती डिलीट केली.