Mohammed Siraj : सिराज-प्रसिधचा जलवा कायम! कसोटी क्रमवारीतही घेतली मोठी झेप, बुमराह अव्वलस्थानी कायम

Mohammed Siraj gains in ICC Test bowling rankings : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताच्या दोन गोलंदाजांनी कमाल केली. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत जवळपास हरलेला सामना भारताच्या पदरात पाडला. संपूर्ण मालिकेत प्रसिध कृष्णासाठी काही विशेष कामगिरी करता आली नव्हती, पण शेवटच्या सामन्यात त्यांनी सारी कसर भरून काढली. या दोघांच्या शानदार कामगिरीचा फायदा त्यांना आता आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही झाला आहे, जिथे त्यांनी मोठी झेप घेतली आहे.
जसप्रीत बुमराह कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम –
भारत-इंग्लंड कसोटी मालिका संपल्यानंतर आयसीसीने नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. शेवटच्या सामन्यात बुमराह खेळला नसला तरी त्याचे 889 रेटिंग गुण कायम आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाचे 851 गुण असून, बुमराहच्या अव्वल स्थानाला सध्या कोणीही धोका पोहोचवू शकणार नाही.
Big changes near the top of the Test rankings following the epic fifth Test between England and India at The Oval 😲
Details 👇https://t.co/O2f86GzxYs
— ICC (@ICC) August 6, 2025
सिराजने तब्बल 12 स्थानांची घेतली झेप –
मोहम्मद सिराजने ओव्हल कसोटी सामन्यात केलेल्या दमदार गोलंदाजीमुळे त्याचे रेटिंग गुण 674 पर्यंत वाढले आहेत. त्याने एकाचवेळी 12 स्थानांची झेप घेत थेट 15व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. सिराजसाठी ही आयसीसी कसोटी क्रमवारीतील आतापर्यंतची सर्वोच्च रँकिंग आहे. त्या इंग्लविरुद्धच्या मालिकेत 23 विकेट्स घेतल्याचा फायदा झाला आहे.
हेही वाचा – Ravindra Jadeja : ‘गोऱ्यांचं तोंड तर पाहा…’, जडेजाने उडवली प्रेक्षकांची खिल्ली; व्हिडिओ व्हायरल
प्रसिध कृष्णाचाही जलवा, 25 स्थानांनी सुधारणा –
प्रसिध कृष्णाने मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खूप धावा दिल्या, पण शेवटच्या सामन्यात तो हिरो ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे रेटिंग गुण 368 पर्यंत वाढले आणि त्याने तब्बल 25 स्थानांची झेप घेत, थेट 59व्या क्रमांकावर स्थान पटकावले. ही प्रसिधचीही आतापर्यंतची सर्वोच्च रँकिंग आहे. आता मालिका संपली असली तरी, पुढील मालिकेत या दोघांची कामगिरी कशी राहील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





