Mohammed Shami – फायनलपूर्वी मोहम्मद शमीच्या आई प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Mohammed Shami – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आई अंजुम आरा यांची प्रकृती खालावली असून त्यांना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती का बिघडली याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
#WATCH उत्तर प्रदेश: क्रिकेटर मोहम्मद शमी की मां अंजुम आरा ने कहा, “भगवान बच्चों (भारतीय क्रिकेट टीम) को जिताएं और उन्हें खुशी से घर वापस लाएं…” pic.twitter.com/XDwnxV93C5
— ANI_HindiNews (@AHindinews) November 18, 2023
काही तासांपूर्वी शमीच्या आईने सकाळी आपल्या मुलाच्या आणि टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली. शमीची आई अंजुम आरा माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या,’आज सकाळीच शमीशी बोलले आणि शमीने सर्वांची विचारपूस केली. अमरोहातील अलीनगरच्या सहसपूर गावात राहणाऱ्या मोहम्मद शमीची आई माध्यमांशी बोलतांना सांगितले होते की,’आम्हाला पूर्ण आशा आहे की भारत हा विश्वचषक जिंकेल.’
आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप फायनल खेळला जात आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने आतापर्यंत 10 सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमी विजयाचा हिरो ठरला होता. या सामन्यात त्याने 7 विकेट घेत इतिहास रचला.





