CSK vs SRH : मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर रचला इतिहास! अन् दुसऱ्याच चेंडूवर केली मोठी चूक, पाहा VIDEO

CSK vs SRH Mohammed Shami’s Historic Feat and Rare No-Ball in IPL 2025 Match : आयपीएल २०२५ च्या ४३ व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिल्याच चेंडूवर इतिहास रचला. पण सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर त्याच्याकडून एक चूक दिसून आली, जी क्रिकेटच्या मैदानावर फार क्वचितच घडते. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने दुसऱ्या चेंडूवर नो बॉल टाकला. पण हा नो बॉल लाईनचा किंवा हाईटचा नव्हता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर रचला इतिहास –
मोहम्मद शमीने या सामन्याची सुरुवात अतिशय धमाकेदार पद्धतीने केली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर शेख रशीदची विकेट घेतली. आयपीएलमध्ये चौथ्यांदा शमीने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट्स घेतली. चार वेळा हा पराक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. याशिवाय, तो आयपीएलमध्ये चौथ्यांदा डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा पहिला गोलंदाज बनला.
🚨 Indian Premier League 2025, CSK vs SRH 🚨
Mohammed Shami takes the wicket of Shaik Rasheed#CSKvSRH #CSKvsSRH #SRHvsCSK #SRHvCSK #IPL2025 #TATAIPL2025 #TATAIPL #Chennai #விசில்போடு #OrangeArmy #ShaikRasheed #MohammedShami #AbhishekSharma pic.twitter.com/zFJnlK42JL
— Sporcaster (@Sporcaster) April 25, 2025
आयपीएल सामन्यात पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज :
- ४ वेळा – मोहम्मद शमी
- २ वेळा – डर्क नॅनेस
- २ वेळा – लसिथ मलिंगा
- २ वेळा – उमेश यादव
- २ वेळा – भुवनेश्वर कुमार
- २ वेळा – ट्रेंट बोल्ट
हेही वाचा – CSK vs SRH : माहीचा नवा विक्रम! सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच केला खास पराक्रम
दुसऱ्या चेंडूवर केली मोठी चूक –
सामन्याच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद शमीने ऐतिहासिक कामगिरी केली, पण दुसऱ्या चेंडूवरच त्याने नो बॉल टाकला. खरंतर, तो गोलंदाजी करताना त्याचा हात स्टंपला लागला.ही घटना रन-अप दरम्यान घडली, ज्यामुळे पंचांनी हा चेंडू नो बॉल म्हणून घोषित केला. क्रिकेटमध्ये अशा घटना फार कमी पाहिल्या गेल्या आहेत, जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करताना त्यांचा हात स्टंपला लागला आहे.





