Saleem Safi Record : २३ वर्षांच्या अफगाण गोलंदाजाने एकट्याने गाजवलं मैदान! ६ विकेट्स घेत रचला इतिहास
Saleem Safi Record : मोहम्मद सलीम सफीने भारताच्या तगड्या फलंदाजीसमोर हार न मानता एकट्याने खिंड लढवली. त्याने २७ षटकांच्या गोलंदाजीत १४० धावा देत भारताचे तब्बल ६ मुख्य फलंदाज तंबूत धाडले.

Mohammad Saleem Safi 6 Wickets vs India Mullanpur Test 2026 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना मुल्लानपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला आहे. भारताने आपला पहिला डाव तब्बल ८ बाद ५६४ धावांवर घोषित करत अफगाणिस्तानला बॅकफुटवर ढकलले. भारतीय फलंदाजांनी अफगाण गोलंदाजांची कडक परीक्षा घेतली असली, तरी या धावांच्या वादळात अफगाणिस्तानच्या २३ वर्षांच्या एका युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या धारदार गोलंदाजीने इतिहास रचत संपूर्ण क्रिकेट जगताला चकित केले आहे. या युवा गोलंदाजाचे नाव मोहम्मद सलीम सफी असे आहे.
भारताच्या मजबूत फलंदाजीचे लचके तोडले; ६ विकेट्ससह इतिहास!
मोहम्मद सलीम सफीने भारताच्या तगड्या फलंदाजीसमोर हार न मानता एकट्याने खिंड लढवली. त्याने २७ षटकांच्या गोलंदाजीत १४० धावा देत भारताचे तब्बल ६ मुख्य फलंदाज तंबूत धाडले. या कामगिरीसह तो कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा अफगाणिस्तानचा केवळ तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने झियाउर रहमान शरीफी (७/९७) आणि निजात मसूद (५/७९) यांच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०२४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण करणाऱ्या सलीमला पहिल्या सामन्यात एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र, आपल्या कारकिर्दीतील अवघ्या दुसऱ्याच कसोटीत त्याने भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध हा कारनामा केला.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच विकेट्स घेणारे अफगाण वेगवान गोलंदाज:
𝐅𝐈𝐕𝐄-𝐖𝐈𝐂𝐊𝐄𝐓𝐒 𝐅𝐎𝐑 𝐒𝐀𝐋𝐄𝐄𝐌 𝐒𝐀𝐅𝐈! 🖐️
Mohammad Saleem Safi has been outstanding, with Manav Suthar becoming his fifth victim as another edge finds the wicketkeeper. 👏👏
What a performance in only his second Test match! 🔥#AfghanAtalan | #INDvAFG |… pic.twitter.com/RTu7bzGvci
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 7, 2026
- ७/९७ – झियाउर रहमान शरीफी विरुद्ध झिम्बाब्वे (२०२५)
- ५/७९ – निजात मसूद विरुद्ध बांगलादेश (२०२३)
- ६/१४० – मोहम्मद सलीम सफी विरुद्ध भारत (२०२६)
भारताचा ५६४ धावांचा विशाल स्कोअर –
Tea on Day 2️⃣ 🫖
Manav Suthar’s maiden Test wicket ends the 2nd session on a sweet note 👌
Scorecard ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PeUtN8pCdO
— BCCI (@BCCI) June 7, 2026
सलीमच्या घातक गोलंदाजीनंतरही भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात ५५० हून अधिक धावा धावफलकावर लावल्या. कर्णधार शुबमन गिलने १२६ धावांची कर्णधारपदाला साजेशी खेळी केली, तर केएल राहुलने १०० धावांचे योगदान दिले. याशिवाय साई सुदर्शन (८१) आणि दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतनेही ८१ धावांची स्फोटक खेळी खेळली. तळात वॉशिंग्टन सुंदरने ५२ धावांची उपयुक्त खेळी केली, तर मानव सुथार आणि मोहम्मद सिराज यांनीही धावा जोडल्या. अफगाणिस्तानकडून सलीमव्यतिरिक्त जियाउर रहमान आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.





