Harshvardhan Sapkal : “मोदींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे”; हर्षवर्धन सपकाळांचे पंतप्रधान मोदींच्या भाषणाला प्रत्युत्तर
Harshvardhan Sapkal : बिलाच्या बाजूने 298 मतं, तर बिलाच्या विरोधात 230 मतदान

Harshvardhan Sapkal : नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर होऊ न शकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. “काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सीमांकन (Delimitation) प्रश्नी सातत्याने खोटे बोलत असून, देशात फाटाफुटीचे राजकारण करत आहेत,” असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला.
यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. “पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे काँग्रेसचा जप आणि खोटारडेपणाचा गजर आहे. महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुर्नरचना विधेयक आणण्याचा प्रयत्न करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्राला संबोधण्याच्या नावाखाली देशातील जनतेला प्रचारकी थाटातील आपले भाषण ऐकवले. ३० मिनिटांच्या भाषणात मोदीजींनी ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले आणि आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी खोटे दावे केले,” असे सपकाळ यांनी म्हंटले.
‘नरेंद्र मोदीजींनीच GST ला विरोध केला होता’
पुढे ते म्हणाले, “काँग्रेसने जनधन-आधार-मोबाईल (JAM) आणि जीएसटीला विरोध केला हा पंतप्रधानांचा दावा म्हणजे त्यांच्या खोटारडेपणाचे उत्तम उदाहरण आहे. २९ सप्टेंबर २०१० रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार येथून आधारचा शुभारंभ पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह व सोनियाजी गांधी यांनी केला होता. GST सुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने पुढे नेला होता; मात्र त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदीजींनीच GST ला विरोध केला होता.
पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे काँग्रेसचा जप आणि खोटारडेपणाचा गजर
महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुर्नरचना विधेयक आणण्याचा प्रयत्न करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्राला संबोधण्याच्या नावाखाली देशातील जनतेला प्रचारकी थाटातील आपले भाषण ऐकवले. ३०…
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) April 18, 2026
पंतप्रधानांनी माता भगिणींची माफी मागण्यापेक्षा आता लागलीच महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे. महिला आरक्षणाचा कायदा नारी शक्ती वंदना तर सप्टेंबर २०२३ मध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या मदतीने मंजूर झालेला आहे.” Harshvardhan Sapkal
‘मोदी सरकारचे कुटील कारस्थान उघड’
“महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणून देशाची निवडणूक संरचना बदलून संविधान आणि लोकशाही मोडीत काढण्याचा मोदी सरकारचे कुटील कारस्थान उघड झाले आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान, लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर घाला घालण्याचा प्रयत्न करून तमाम महिलांची फसवणूक केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे,” अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
दरम्यान, संसदेमध्ये शुक्रवारी महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर मतदान पार पडलं. हे बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतदानाची आवश्यकता होती. मात्र बिलाच्या बाजूने 298 मतं पडली तर बिलाच्या विरोधात 230 मतदान झालं. हे बिल मंजूर होण्यासाठी 360 मतांची गरज होती, मात्र 62 मत कमी पडल्यानं संसदेमध्ये हे बिल नामंजूर झालं. Harshvardhan Sapkal
हेही वाचा:
Pune Water Cut : पुणेकरांची धाकधूक वाढली! पाणी कपातीचे ३ पर्याय आयुक्तांच्या टेबलावर; पाहा काय होणार





