Mumbai Police : मोठी कारवाई ! विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
सोशल मीडियावर एका व्हीडीओमध्ये पोलीस कर्मचारी (Mumbai Police) तरुणाला धमकावताना दिसत आहे. पुन्हा दिसलास तर ५० ग्रॅमची पावडर खिशात टाकेन… अशी धमकी देतो.

Mumbai Police : सोशल मीडियावर एका व्हीडीओमध्ये पोलीस कर्मचारी (Mumbai Police) तरुणाला धमकावताना दिसत आहे. पुन्हा दिसलास तर ५० ग्रॅमची पावडर खिशात टाकेन… अशी धमकी देतो. याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद उल्लेख केला. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच गृहखात्याकडून या पोलिसाविरोधात कारवाई करण्यात आली.
पवन सांगळे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सायन पोलिस स्टेशनला (Mumbai Police) तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. या व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी धमकी देणा-या पवन सांगळेला निलंबित केले आहे.
महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा याच व्हिडिओवरून पोलिस महासंचालकांची (Mumbai Police) आज भेट घेतली. अशा प्रकारे धमकावणा-या पोलिसाला निलंबित करावे, अशी कॉंग्रेसने मागणी केली होती. पोलिसांनी ती मान्य केली.
पोलिस ५० ग्रॅम पुडीची भाषा करतो. पोलिसच अमली पदार्थांचे रॅकेट चालवत आहेत का? कांडला बंदरातून हे ड्रग्ज येतात का? हा मोठा विषय आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली याची चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.






