मुंबई : मनसेचे जोरदार कमबॅक; राज्यातून ‘इतके’ उमेदवार विजयी; महापालिकांसाठी नवी उभारीराज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवकपदी मनसेने जोरदार कमबॅक केलेले आहे. मनसेचे एकूण 11 उमेदवार नगरसेवकपदी विजयी झाले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने मनसेचे विजयी झालेले उमेदवार हे पक्षाला नवी उभारी देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गुहागर नगरपंचायतीवर कोमल जांगळी या नगरसेवकपदी विजयी झाल्या. त्यामुळे कोमल जांगळी यांच्या नावाने मनसेला पहिले खाते उघडता आले. यानंतर संध्याकाळपर्यंत मनसेचे एकूण 10 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे मनसेचे 11 नगरसेवक विजयी झालेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, देवरुख नगरपरिषदेमध्ये मनसेचे तीन नगरसेवक विजयी झालेले आहेत. तसेच, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवणारे दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे यांचा पंढरपूर नगरपालिका वॉर्ड क्रमांक 17 मधून विजय झाला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील भोकर नगरपरिषदेमध्ये भाजपाच्या उमेदवाराला धोपीपछाड करत मनसेचे साईप्रसाद जटालवार हे मोठ्या फरकांच्या मताने विजयी झालेले आहेत. त्यामुळे एकंदरित पाहता मनसेने महापालिकांच्यादृष्टीने ही लिटमस टेस्ट पास केली आहे. मनसेचे विजयी उमेदवार अनुराग कोचिरकर (देवरुख) सिद्धेश वेल्हाळ ( देवरुख ) अक्षय झेपले (देवरुख) संतोष चव्हाण (वडगाव,कोल्हापूर) माधुरी धोत्रे (पंढरपूर) स्वाती चौगुले (गडहिंग्लज) राजू पाटील (अचलपूर) दौलत पाटील (हुपरी) वाहेद शेख (रेणापूर,लातूर) साईप्रसाद जटालवर (भोकर) कोमल जागळी (गुहागर)