MNS Leader Accident : मनसेच्या बड्या पदाधिकाऱ्याला भरधाव कारने उडवलं; प्रकृती चिंताजनक
MNS Leader Accident : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड विधानसभा अध्यक्षांना एका भरधाव कारने जोरदार धडक दिली आहे.

MNS Leader Accident : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे यांना भरधाव कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. या अपघातात शेटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. (MNS Leader Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास राजेश शेटे दुचाकीवरून बिलोली परिसरातून आदर्श स्कूलच्या दिशेने जात होते. बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर ते आदर्श नगरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. (MNS Leader Accident)
धडक इतकी जबरदस्त होती की शेटे रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (MNS Leader Accident)
दरम्यान, हा संपूर्ण अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. अपघातानंतर कार चालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून वाहनाचा क्रमांक आणि चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. (MNS Leader Accident)
घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली. या घटनेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून फरार चालकाचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. (MNS Leader Accident)
या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालकाला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (MNS Leader Accident)





