Nevase News : अपघातांच्या वाढत्या घटनांनी नेवासेकर चिंतेत; प्रशासनाचे दुर्लक्ष?
Nevase News : या वाढत्या अपघाताकडे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन खात्याने लक्ष खालून रस्ता अपघातात निष्पाप जीवांचा प्राण वाचविण्याची मागणी सध्या जनतेतून केली जात आहे.

नेवासे : नेवासे तालुक्यात सध्या रस्ते अपघातात प्रचंड वाढ झालेली असल्याचे दिसून येत येत असून २०२५ तुलनेत या चालू वर्षी अपघातांची संख्या मोठी चिंताजनक बनली आहे. या अपघातांची सर्वाधिक कारणे हे अतिवेग, नियमांचे उल्लंघन न करणे आणि आपले ताब्यातील वाहन चालवितांना चालक चक्क मदधुंद अवस्थेत सापडत असून काहींना प्रशिक्षणाचा अभाव असल्याचेही दिसून येत आहे. या रस्ते अपघातांचा वाढता आलेख सध्या नेवासे तालुक्यात दिसून येत आहे. या वाढत्या अपघाताकडे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन खात्याने लक्ष खालून रस्ता अपघातात निष्पाप जीवांचा प्राण वाचविण्याची मागणी सध्या जनतेतून केली जात आहे.
नेवासे तालुक्यात सध्या अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर सध्या अपघाताचे प्रचंड प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक निष्पाप जीवांनाही आपला प्राण गमवावा लागत असून काहींना सध्या कायमचे अपंगत्व येततांना दिसून येत आहेत. या अपघाताला जबाबदार असणाऱ्या वाहनचालकांवर आता पोलीस आणि प्रादेशिक परिवहन खात्याने कारवाईचा आसूड उगारण्याची मागणी जनतेतून होतांना दिसून येत आहे.
हे रस्ते अपघात रोखण्यासाठी संबंधित ठिकाणी उपाययोजना करून आवश्यक तेथे वेग नियंत्रणासाठी रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, थर्मोप्लास्टिक आणि सूचना फलक तसेच रस्त्यावरील परावर्तक, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स या उपाय योजना करून अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही सध्या जनतेतून जोर धरू लागली आहे. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी अपघातग्रस्त व्यक्तींना वेळीच मदत मिळण्यासाठी ‘108- रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मंडळी वेळेत उपलब्ध होत नाही. खासगी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होऊन अपघाग्रस्त व्यक्तींना मदत करत असताना 108 या रुग्णवाहिकेला कॉल करूनही वेळीच दाखल होत नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.



