MNS Candidate | Maharashtra Assembly Elections 2024 – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीच आपली काही नावे सभांच्या माध्यमातून जाहीर केली आहेत. त्यानंतर आता डोंबिवलीमधील एका कार्यक्रमातून त्यांनी विद्यमान आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव या दोन शिलेदारांच्या नावांची घोषणा केली आहे. डोंबिवली येथे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते. याचवेळी त्यांनी ही घोषणा केली. राज ठाकरे म्हणाले, उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. आज किंवा उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होईल. पण त्यापूर्वी कल्याण ग्रामीणमधून मी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो आहे. येत्या २४ तारखेला मी दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.