ACB Action On Bagidora MLA | राजस्थानच्या बागीदौरा येथील एका आमदाराला लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. विधानसभेत खाणकाम संदर्भातील प्रश्न हटवण्याच्या बदल्यात आमदाराने तब्बल १० कोटींची मागणी केली होती. या प्रकरणात २० लाख रुपये स्वीकारताना आमदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. जयकृष्ण पटेल असे भारतीय आदिवासी पार्टीच्या आमदाराचे नाव आहे. जयकृष्ण पटेल यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते एका कंपनीला गेल्या काही काळापासून काम न करण्याबाबत त्रास देत होते. त्यांनी तडजोड करत कंपनीकडून अडीच कोटी रुपये मागितले होते. त्यानंतर 4 एप्रिल रोजी तक्रारदार रविंद्र सिंग यांनी ACB मध्ये तक्रार नोंदवली होती. एसीबीने असा रचला सापळा तडजोडीनंतर पहिला हफ्ता आमदाराला एक लाख रुपये रोख देण्यात आला. त्यानंतर एसीबीने सापळा रचून पुरावे गोळा केले. पुढचा हफ्ता २० लाख रुपयांचा जयपूरमध्ये आमदाराच्या निवासस्थानीच दिला जाणार होता. त्यादिवशी आमदार स्वत: जयपूरला पोहोचले आणि नोटांनी भरलेली बॅग घेतली. त्यावर त्यांच्या बोटांचे ठसेही आढळून आले आहेत. आमदाराने लाच घेतल्याचे तांत्रिक पुरावेही एसीबीने सादर केले. ACB Action On Bagidora MLA | तसंच दावा केला की नोटांवर विशेष शाई लावली होती. ऑडिओ, व्हिडीओ आणि फोटोही पुरावे म्हणून आमच्याकडे आहेत. बॅग उचलताना आमदाराच्या बोटांचे ठसे त्यावर असल्याचंही एसीबीने सांगितलं. दरम्यान, आमदाराच्या वतीने पैसे घेणारा व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला आहे. मात्र त्या व्यक्तीचं पैसे घेऊन जातानाचा रेकॉर्डिंग असल्याचा दावा एसीबीने केला आहे. जयकृष्ण पटेल कोण आहेत? जयकृष्ण पटेल हे बांसवाडा येथील आनंदपुरी तहसीलमधील कानेला गावचे रहिवासी आहेत. 2023 मध्ये जयकृष्ण पटेल यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानमधील बागीदौरा विधानसभा ही नेहमीच काँग्रेसचा गड मानली जात होती, परंतु मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत भारत आदिवासी पक्षाने हा गड हाती घेतला. पोटनिवडणुकीत भारत आदिवासी पक्षाचे जयकृष्ण पटेल यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांना 1,22,573 मते मिळाली, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष तंबोलिया यांना 71,139 मते मिळाली. येथे पटेल यांनी 50 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. बागीदौरा जागा काँग्रेसचे आमदार महेंद्रजीत मालवीया यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती. सध्या राजस्थानमध्ये भारत आदिवासी पक्षाचे 4 आमदार आहेत. हेही वाचा: Harshwardhan Sapkal : भाजपकला निवडणूक जिंकायला काँग्रेसवालेच लागतात : हर्षवर्धन सपकाळ