Bacchu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली आहे. कोणतीही बातमी अशीच हवेत येत नाही, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी आगामी विधान परिषद निवडणुका लढवण्याबाबत संकेत दिले. (Bacchu Kadu) शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी आक्रमक आंदोलन करणारे बच्चू कडू आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेकडे झुकलेले त्यांचे पाऊल राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. फक्त आमदारकीसाठी मी कोणासोबत जाणार नाही. पण शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांचे प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सुटणार असतील तर त्यासाठी विचार करू शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. (Bacchu Kadu) सध्याच्या राजकारणावर टीका करत ते म्हणाले, लोक मेंढरांसारखे जाती-धर्माच्या मागे लागले आहेत. माझ्यासारख्या शेतकरी आणि शेतमजुरांसाठी काम करणाऱ्या माणसाचा विधानसभेत पराभव झाला. तरीही मी लोकांसाठी काम करणे थांबवले नाही, असे ते म्हणाले. (Bacchu Kadu) त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. अनेकांच्या मते, बच्चू कडू यांची प्रतिमा ही सत्तेविरोधात लढणाऱ्या आक्रमक नेत्याची राहिली आहे. त्यामुळे त्यांनी जर शिवसेनेसारख्या सत्ताधारी पक्षासोबत समझोता केल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. (Bacchu Kadu) प्रहार पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिवसेनेत विलिनीकरणाची. शिवसेना नेतृत्वाकडून बच्चू कडूंना धनुष्यबाण चिन्हावर विधान परिषदेत पाठवण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी प्रहार पक्षाचे विलिनीकरण करण्याची अट असल्याचे बोलले जात आहे. यावर बच्चू कडू म्हणाले की, मला विलिनीकरणाच्या प्रस्तावाबाबत मीडियामधूनच माहिती मिळाली. मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती, पण अद्याप स्पष्टता नाही. आमच्याही काही अटी आणि शेतकरी-दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत प्रस्ताव आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (Bacchu Kadu)