Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Mithun Chakraborty : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mithun Chakraborty : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Mithun Chakraborty)
मिथुन चक्रवर्ती यांच्या रुग्णालयातील उपचारांनंतर पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी त्यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा मिथुन चक्रवर्ती यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. (Mithun Chakraborty)
शुभेंदु अधिकारी यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतः त्यांच्याशी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सामिक भट्टाचार्य यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली होती. मात्र, ही बाब सार्वजनिक व्हावी अशी त्यांची इच्छा नव्हती. (Mithun Chakraborty)
मिथुन चक्रवर्ती यांच्या शस्त्रक्रियेची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, त्यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया करण्यात आली, याबाबत रुग्णालय किंवा कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Mithun Chakraborty)
मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपल्या कारकिर्दीत ‘डिस्को डान्सर’, ‘अग्निपथ’, ‘ताहादेर कथा’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले असून, २०२४ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. (Mithun Chakraborty)






