Sangli News : सांगलीत तब्बल ११ देशी बनावटीची पिस्टले जप्त; तीन रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद
Sangli News : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत मोठी यशप्राप्ती केली आहे.

Sangli News : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीची ११ पिस्टले, २२ जिवंत काडतुसे आणि २ स्पेअर मॅगझिन असा तब्बल ७ लाख ६३ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Sangli News)
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मयुरेश मनोहर आदाटे (सध्या रा. चाकण, पुणे), मारुती अशोक गुजले ( रा. जांभुळमळा, ता. खानापूर), वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे (रा. ताडाची वाडी, ता. खानापूर) यांना जेरबंद करण्यात आले आहे. पाजी, (रा. सेधवा, मध्य प्रदेश. पूर्ण नाव व पत्ता नाही) हा परागंदा आहे. (Sangli News)
मयुरेश आदाटे विटा-आटपाडी मार्गावरील नेलकरंजी फाट्यावर पिस्टल विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाण्यावर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. (Sangli News)
चौकशीत त्याने ही पिस्टले मारुती गुजले याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मारुती गुजलेला पकडून त्याच्याकडून तीन पिस्टले व सहा काडतुसे जप्त करण्यात आली. त्याने ही पिस्टले वैभव उर्फ गब्बर इंगळे यांच्याकडून जादा दराने विक्रीसाठी घेतली असल्याची माहिती मिळाली. (Sangli News)
पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सात पिस्टले, १४ जिवंत काडतुसे आणि दोन स्पेअर मॅगझिन जप्त करण्यात आली. चौकशीत ही सर्व शस्त्रे मध्यप्रदेशातील ‘पाजी’ नावाच्या तस्कराकडून आणल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध सुरू आहे. (Sangli News)
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, अंमलदार प्रकाश मंजुळे, अतुल माने, हणमंत लोहार, सुशील म्हस्के, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, ऋतूराज होळकर, सुमित सूर्यवंशी, रोहन घसते, तसेच चालक गणेश शिंदे आणि सुशांत चिले यांनी केली. (Sangli News)
Sangli News : माजी कनिष्ठ लेखाधिकार्याकडे सापडली 82 लाख 89 हजारांची बेहिशोबी मालमत्ता






