चिंबळी- येथील बटवाल वस्तीतील ओमशांती बालकगृहामधील इयत्ता सातवीतील मुलगी बुधवार (दि. 11) पासून बेपत्ता असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. आसमा हनीफ शेख (वय 12) असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. बेपत्ता आसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे; उंची 4 फूट 4 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, केस काळे, अंगात जांभळ्या रंगाची फ्रॉक, जीन्स पॅन्ट, काळ्या रंगाचा सॅन्डल, गुलाबी रंगाची सॅक सोबत आहे. या वर्णानाची मुलगी कोणास आढळल्यास आळंदी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पी. एन. बनकर करीत आहेत.