nagar | मंत्री विखेंनी शेतकरी हित जोपासले : अध्यक्ष पवार

पारनेर, (प्रतिनिधी) – राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर ३० स्थायी भाव व शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे.
या माध्यमातून मंत्री विखेंनी शेतकरी हित जोपासले आहे. या भावाबाबत मंत्री विखे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले असल्याचे पारनेर तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष दत्तानाना पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले की,आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता.यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर ३० रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुधाचे नवीन दर १ जुलैपासून लागू होतील.
याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केले. सरकारकडून शेतकऱ्यास ५ रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिलिटर ३५ रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शासन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष भाजप.





