“मिंधेंनी मुंबईची तिजोरी धुतली”; रस्त्यावरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

Aditya Thackeray | ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. फेकनाथ मिंधे यांच्या भ्रष्ट कारभाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सोडलं नाही, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी सरकारवर खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ट्वीट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक भाष्य केले.
वाकोला पुलावरील खड्ड्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना फोन केला, यावरूनच आदित्य ठाकरे यांनी ही घणाघाती टीका केली. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिले की, “फेकनाथ मिंधे ह्यांच्या भ्रष्ट कारभाराने आज मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही. वाकोला पुलावरील खड्डे, ह्या बाबत आमचे आमदार वरुण सरदेसाई ह्यांनी व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता.” Aditya Thackeray |
🚨 फेकनाथ मिंधे ह्यांच्या भ्रष्ट कारभाराने आज मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही! 🚨
वाकोला पुलावरील खड्डे, ह्या बाबत आमचे आमदार वरुण सरदेसाई ह्यांनी विडियो सोशल मिडियावर शेअर केला होता.
२ वर्ष मी सातत्याने सांगतोय की ५ कंत्राटदारांना हाताशी घेऊन मिंधेनी स्वतःचे खिसे भरले, पण अजून…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 22, 2025
‘पाच कंत्राटदारांना हाताशी घेऊन मिंधेनी स्वतःचे खिसे भरले’
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, “२ वर्ष मी सातत्याने सांगतोय की ५ कंत्राटदारांना हाताशी घेऊन मिंधेनी स्वतःचे खिसे भरले, पण अजून खड्डे करुन ठेवले आणि आज मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी महापालिका आयुक्तांना फोन केल्याची बातमी आहे एकच गम्मत… ह्या भ्रष्ट कारभाराला त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा गेली दोन वर्ष होता. मिंधेना वॉशिंग मशीनमध्ये त्यांनीच धुतलं आणि मिंधेंनी मुंबईची तिजोरी धुतली”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लगावला. रस्त्यांच्या कामांमध्ये शिंदे यांनी स्वतःचे खिसे भरल्याचा आरोप ठाकरेंनी पुन्हा एकदा केला आहे. Aditya Thackeray |
हेही वाचा:
Ek Deewane Ki Deewaniyat Movie Teaser : ‘सनम तेरी कसम’फेम अभिनेत्याच्या नवीन सिनेमाचा टीझर प्रदर्शित





