Aditya Thackeray : मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरेंच्या भेटीची चर्चा; आता एक व्यक्ती गावी जाईल! आदित्य ठाकरेंनी कुणावर साधला निशाणा?

Devendra Fadnavis : काल संध्याकाळी मुंबईतील सॅाफिटेल हॅाटेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यात भेट झाल्याची बातमी समोर आली होती. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार साधारण दोन्ही नेत्यांमध्ये दोन ते तीन तास बैठक पार पडली.
या बैठकीत हॅाटेलमध्ये संबंधित ठिकाणी कोणालाही येण्यास परवानगी नव्हती अशा बातम्या समोर देखील आल्याने मोठी चर्चा झाली. मात्र, रात्री आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली नसल्याची माहिती दोन्ही नेत्यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना उद्धव ठाकरेंना युतीची ऑफर दिली होती.
दुसऱ्याच दिवशी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची बातमी आली अन् राजकारणात चर्चांना उधान आले. आता ही बातमी म्हणजे अफवा असल्याचे बोलले जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे दोघांनीहीआपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरेंसोबत कोणतीही भेट अथवा बैठक झालीच नाही. आम्ही दोघे समोरासमोरही आलो नाही. आदित्य ठाकरे आणि मी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये आलो होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि माझ्यात कोणतीही भेट झाली नाही. माझ्या मित्रांसोबत डिनरसाठी आलो होतो, असे स्पष्टीकरण देत ही बातमी अफवा असल्याचे सांगितले आहे.
एकनाथ शिंदेंना लगावला टोला
काल शनिवारी संध्याकाळी साधारण साडेसहा ते रात्री ९ वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यात भेट झाल्याची बातमी धडकली. आदित्य ठाकरे यांनी हॅाटेलमधून बाहेर पडताना स्मित हास्य केले अशाही बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे चर्चांना अधिक उधाण आले होते. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये भेटीच्या बातम्या ऐकत होतो. एक व्यक्ती आता बातम्या पाहून गावी जाईल असे वाटतेय, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
हेही वाचा : Pune : महापालिकेच्या शाळा वाऱ्यावर; शिक्षकांची तब्बल २४७ तर मुख्याध्यापकांची ५७ पदे रिक्त





