Ek Deewane Ki Deewaniyat Movie Teaser : ‘सनम तेरी कसम’फेम अभिनेत्याच्या नवीन सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Ek Deewane Ki Deewaniyat Movie Teaser : बॅाक्स अॅाफिसवर सैय्यारा या सिनेमाने ताबडतोड कमाई केली. या लव्हस्टोरी सिनेमाने अनेक मोठ्या सिनेमांचे रेकॅार्ड मोडित काढले आहेत. तरुणांना तर या सिनेमांने वेडं लावलं आहे. थेएटरमध्ये हा सिनेमा सुरू असताना अनेक तरुण-तरुणी धसाधसा रडले. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता सनम तेरी कसम फेम अभिनेता हर्ष राणे याच्या नव्या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमाचं नाव आहे, ‘एक दिवाने की दिवानियत’.
या सिनेमात अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनम बाजवा यांचा जोडी पाहायला दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केलं आहे. या सिनेमात एक भावनिक प्रेमकथा दाखविण्यात आल्याचे टीझरमधून दिसत आहे. सनम तेरी कसम या सिनेमानंतर अभिनेता हर्षवर्धन राणे याचा कोणताही सिनेमा चर्चेत आला नव्हता. मात्र, त्याच्या या नव्या सिनेमामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना हर्षच्या सनम तेरे कसम या सिनेमाची आठवण झाली आहे. यामुळे आता अभिनेत्री सोनम बाजवा आणि हर्षवर्धन राणे यांची अॅानस्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. या सिनेमाची कथा मुश्ताक शेख यांनी लिहिली आहे. ‘एक दिवाने की दिवानियत’ हा सिनेमा दिवाळीच्या शुभमुहर्तावर म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा : DTPH: करिश्मा कपूरचा खुलासा… ‘दिल तो पागल है’ साठी कोणतीही अभिनेत्री माधुरीसोबत काम करायला तयार नव्हती





