बावड्यात मारुतीला दुग्धाभिषेक

बावडा -राज्यात अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे दूध मातीमोल किमतीने खरेदी करून त्यावर मलई खासगी दूध संस्थांच्या माध्यमातून लाटली जाते. पण शेतकऱ्याला योग्य किंमत मिळत नाही, यासाठी बावडा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी मारुतीला दुग्धाभिषेक घालून सरकारचा निषेध व्यक्त केला.
भाजप, रयतक्रांती, आरपीआय, शिवसंग्राम, रासप महायुतीच्या माध्यमातून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दूध बंद आंदोलन शनिवारी सकाळी 9 गावातील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, विकास पाटील, बावड्याचे सरपंच किरण पाटील, महादेव घाडगे, संग्राम पाटील, अजय पाटील, रणधीर पाटील, माजी सैनिक लक्ष्मण घोगरे, माजी उपसरपंच अमोल घोगरे, सचिन सावंत, पवन घोगरे आदींसह भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.





