MI vs SRH : मुंबईने हैदराबादला पाणी पाजत नोंदवला सलग दुसरा विजय, हार्दिक-जॅक्सने बजावली महत्त्वाची भूमिका

MI vs SRH Mumbai Indians beat Sunrisers Hyderabad : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाने सनरायझर्स हैदराबादला वानखेडे स्टेडियमवर ४ गडी राखून पराभूत केले. यासह, मुंबईने हंगामातील तिसरा विजय नोंदवला. यासह मुंबई इंडियन्सने सलग २ सामने जिंकून आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील खेळाडू पॅट कमिन्सच्या सनरायझर्स संघाला विजयाची लय कायम राखता आली नाही आणि त्यांना या हंगामातील पाचवा सामना गमावावा लागला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत पाच गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, मुंबईने १८.१ षटकांत सहा गडी गमावून १६६ धावा करून सामना जिंकला. मुंबईसाठी कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही, परंतु प्रत्येकाने खेळलेल्या छोट्या खेळीच्या जोरावर सहज विजय मिळवला.
𝐖𝐢𝐥𝐥 for the 𝐖𝐢𝐧 💪
A complete all-round performance from Will Jacks earns him a well deserved Player of the Match award 🫡
Scorecard ▶ https://t.co/8baZ67Y5A2#TATAIPL | #MIvSRH | @mipaltan pic.twitter.com/s10ej494Rv
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
मुंबईचा हा सात सामन्यांतील तिसरा विजय आहे आणि ते सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत. त्याच वेळी, सनरायझर्सना सात सामन्यांपैकी चौथा पराभव पत्करावा लागला आहे आणि ते चार गुणांसह नवव्या स्थानावर आहेत.
हैदराबादच्या स्फोटक फलंदाजांनी केली निराशा –
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या स्फोटक सलामी जोडीला चौकार आणि षटकार मारण्यासाठी संघर्ष करावा लागला. अभिषेक (४०) ने तरीही काही छान फटके मारून संघाला जलद सुरुवात देण्याचा प्रयत्न केला, पण हेड (२८) त्याच्या संपूर्ण डावात संघर्ष करत राहिला. परिणामी १० षटकांत फक्त ७५ धावा काढता आल्या आणि १५ षटकांत फक्त १०५ धावा काढता आल्या. येथे, हेनरिक क्लासेन (३७) ने वेग थोडा वाढवला आणि १८ व्या षटकात २१ धावा फटकावल्या. त्यानंतर २० व्या षटकात, हैदराबादने हार्दिक पंड्याच्या षटकात ३ षटकारांसह २२ धावा काढत १६२ धावांचा टप्पा गाठला. त्यांच्याकडून विल जॅक्सने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
मुंबईच्या फलंदाजांनी मिळवून दिला विजय
प्रत्युत्तरादाखल, मुंबईने वेगवान सुरुवात केली आणि विशेषतः रोहित शर्माने वानखेडेवर ३ षटकार मारून उपस्थित असलेल्या चाहत्यांची मने जिंकली. पण पुन्हा एकदा, रोहित (२६) त्याच्या डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयशी ठरला. तथापि, रायन रिकलटन (३१) ने काही मोठे फटके मारले आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव (२६) ने चौकार आणि षटकार मारले.
दरम्यान, विल जॅक्स (३६) नेही संघाच्या धावसंख्येला चालना देण्यासाठी लढाऊ खेळी केली. पॅट कमिन्सने (३/२६) दोन्ही विकेट घेऊन पुनरागमनाच्या आशा निर्माण केल्या असल्या तरी, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हार्दिक पंड्या (२१) आणि तिलक वर्मा (१७) यांनी संघाला विजय मिळवून दिला.





