MI vs CSK : चेन्नईने वानखेडेवर टांगली मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवाची लक्तरं! संजू-अकीलच्या जोरावर सीएसकेने १०३ धावांनी नोंदवला ऐतिहासिक विजय
MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसन आणि अकील होसेनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएलच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकतर्फी सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा १०३ धावांनी पराभव केला.

MI vs CSK Chennai Super Kings Biggest Win IPL 2026 : वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री आयपीएल २०२६ चा ३३ वा सामना पार पडला, जो मुंबई इंडियन्ससाठी एका भीषण स्वप्नासारखा ठरला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मुंबईचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात १०३ धावांनी धुव्वा उडवला. या विजयामुळे चेन्नईने केवळ गुणतालिकेत आगेकूच केली नाही, तर इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे.
सीएसकेने नोंदवला सर्वात मोठा विजय –
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा हार्दिक पंड्याचा निर्णय अंगलट आला. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या (१०१)* झंझावाती शतकाच्या जोरावर २० षटकांत २०७ धावांचा डोंगर उभा केला. या डोंगराखाली मुंबईचा संघ दबला गेला आणि संपूर्ण संघ २० षटकांत अवघ्या १०४ धावांवर आटोपला. चेन्नईने हा सामना १०३ धावांनी जिंकून आयपीएल इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.
Wankhede painted in Yellow 💛
Gurjapneet Singh with the final wicket for #CSK ✌️
A commanding win by 1⃣0⃣3⃣ runs 👏
Scorecard ▶️ https://t.co/gGt34dqUoq#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/meXDihvgGy
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
संजू सॅमसनचा ‘रुद्रावतार’ –
Sanju Samson stepping up at Wankhede again 🤩
He is adjudged the Player of the Match for his hundred 🏅
WATCH HIS KNOCK ▶️ https://t.co/CEOEHXRUR7#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK pic.twitter.com/SmWGHXCEX1
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
सलामीला आलेल्या संजू सॅमसनने मुंबईच्या गोलंदाजांना मैदानावर पळता भुई थोडी केली. त्याने अवघ्या ५४ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा कुटल्या. हे त्याचे या मोसमातील दुसरे शतक आहे. संजूला कर्णधार ऋतुराज गायकवाड (२२) आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस (२१) यांनी मोलाची साथ दिली. संजूच्या या खेळीमुळे चेन्नईने २०० धावांचा टप्पा ओलांडला.
मुंबईची नामुष्की, ऐतिहासिक हार –
Best #TATAIPL figures ✅
Akeal Hosein spun his 𝙒𝙚𝙗 𝙖𝙩 𝙒𝙖𝙣𝙠𝙝𝙚𝙙𝙚 🕸️
Relive his spell ▶️ https://t.co/ndD8uBfdXd #KhelBindaas | #MIvCSK | @AHosein21 pic.twitter.com/xkFlqEJLwX
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील हा धावांच्या फरकाने झालेला सर्वात मोठा पराभव आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मुंबईचा संपूर्ण संघ १९ षटकांत १०४ धावांत गारद झाला. मुंबईकडून सूर्याने (३६) आणि तिलकने सर्वाधिक (३७) धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत गझनफर आणि अश्वनी कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले, तर बुमराहला १ विकेट्स मिळाली, पण ते धावा रोखण्यात अपयशी ठरले. या पराभवामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली असून, ऋतुराजच्या नेतृत्वाखालील चेन्नईने वानखेडेवर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.





