Metro : मुल्लई थोट्टम ते पोरुल जंक्शनपर्यंत धावणार मेट्रो

चेन्नई : चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडने सोमवारी त्यांच्या चालकविरहित ट्रेनच्या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातली चाचणी यशस्वी झाली आहे. या दरम्यान, मुल्लई थोट्टम ते पोरुल जंक्शनपर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली. हा १० किमी लांबीचा ट्रॅक पूनमल्ली मेट्रो स्टेशनला पोरूर जंक्शनशी जोडतो. मुल्लई थोट्टम स्टेशनपर्यंत सुरू झालेली ३ किमीची चाचणी धाव ही एक महत्त्वाची पायरी आहे.
जर सर्व काही व्यवस्थित झाले तर डिसेंबरच्या अखेरीस या मार्गावर मेट्रो धावण्यास सुरुवात होईल. ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. चेन्नई मेट्रो फेज २ प्रकल्पासाठी ६३,२४६ कोटी रुपये खर्च आला आहे. पूनमल्ली – पोरूर दरम्यान धावणारी मेट्रो १० ठिकाणी पोहोचू शकेल.
मेट्रो पूनमल्ली बायपास, पूनमल्ली, मुल्लैथोत्तम, कारायनचावडी, कुमनंचवडी, कट्टुपक्कम, इय्यप्पंथंगल, थेल्लयागारम, पोरूर बायपास आणि पोरूर जंक्शन दरम्यान धावेल. चेन्नई मेट्रोने मार्चच्या अखेरीस पूनमल्ली आणि मुल्लैथोट्टम दरम्यान पहिली चाचणी सुरू केली. या काळात काही तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागले. तेव्हापासून, मेट्रो योग्यरित्या चालवण्यावर भर देण्यात आला.





