Met Gala 2025 : विदेशी भूमीवर देसी तडका.! ‘मेट गाला’मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची फुल्ल हवा; वाचा ‘फॅशनचा ऑस्कर’ची रंजक कहाणी

Met Gala 2025 : सध्या मनोरंजनविश्वात मेट गालाचेच वारे वाहत आहे. आता ज्यांना मेट गालाबद्दल थोडीफार माहिती असेल त्यांना हे ज्ञात असेल की, हा मेट गाला कार्यक्रम मोठा प्रतिष्ठेचा, ग्लॅमरस आणि महत्वाचा मानला जातो. अतिशय विचित्र फॅशनसाठी देखील हा शो जगप्रसिद्ध आहे.
यंदा ‘मेट गाला २०२५’ मध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने पदार्पण केलं आहे. त्याच्यासह लवकरच आई होणारी अभिनेत्री कियारा अडवाणी, प्रसिद्ध गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ, उद्योजिका ईशा अंबानी असे अनेक सेलिब्रिटी ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर उपस्थित होते.
यंदाचा हा सोहळा न्यूयॉर्कमध्ये संपन्न होत आहे. मेट गाला हा दरवर्षी न्यू यॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित केला जाणारा एक प्रसिद्ध फॅशन शो आहे. १९४८ मध्ये या इव्हेंटला सुरुवात झाली.
आज हा शो अतिशय मानाचा शो समजला जातो. दरवर्षी या शो साठी विविध थीम ठेवल्या जातात आणि त्याच टीमला अनुसरून सेलिब्रिटी आपला लूक तयार करतात.
Shah Rukh Khan, and His Jeweled Tiger’s Head, Make Their Met Debut 🖤🔥
KING KHAN AT MET GALA #ShahRukhKhan #MetGala2025 pic.twitter.com/VsZYQNScxM
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) May 5, 2025
यंदा २०२५ सालासाठी मेट गालाची थीम ‘सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाइल’आहे, जी काळ्या फॅशन वारशानं प्रेरित आहे. कार्यक्रमाच्या ड्रेस कोडबद्दल सांगायचं झालं तर, ‘टेलर्ड फॉर यू’वर आधारित आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून हा सोहळा सुरु होतो. याला “फॅशनचा ऑस्कर” असंही म्हटलं जातं. इथे जगातील सगळ्यात मोठे कलाकार, डिझायनर्स, आणि सेलेब्रिटी उपस्थित राहतात.
View this post on Instagram
दरम्यान, २०१७ पासून या फॅशन इव्हेंटमध्ये भारतीय सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. मेट गालासाठी पाहुण्यांची यादी Vogue संपादक आणि टीमकडून तयार केली जाते. दरवर्षी ६०० जणांची यादी तयार करण्यात येते. ज्यामध्ये सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवले जाते.
यात एखाद्या प्रसिद्ध सेलेब्सच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडलाही आमंत्रण देण्यात येते. या इव्हेंटमध्ये अनेक बॉलीवूड, हॉलीवूडचे सेलेब्रिटी सहभागी होत आहेत. एक गोष्ट तुम्हाला माहित का? शाहरुख खानची मेट गालामध्ये हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ होती.
तसंच दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणीनेही पहिल्यांदाच सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. किंग खानने डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेला आऊटफिट परिधान केला होता.





