नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

नेवासा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक पाठिंब्यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पाणी पाजले आहे. वीर भारतीय जवानांच्या पाठीमागे संपूर्ण भारत उभा असून, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे,” असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी केले.
नेवासा येथे आयोजित तिरंगा रॅली आणि श्रद्धांजली सभेमध्ये ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “देशभरातून निघणाऱ्या तिरंगा रॅलीद्वारे जवानांच्या पाठीशी असलेला जनसमुदाय दिसून येत आहे. नेवासातील जनतेनेही या माध्यमातून आपल्या देशभक्तीची प्रचिती दिली आहे.”
या वेळी आमदार लंघे म्हणाले की, “सिंदूर ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या जवानांना आणि बलगाव येथील दुर्दैवी मृत्यू झालेल्या नागरिकांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.”
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख मेजर, धनक मेजर, जावळे मेजर हे उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपा शहराध्यक्ष मनोज आण्णा पारखे यांनी केले. मेजर चौधरी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
तिरंगा रॅलीत उपस्थित मान्यवर व नागरिक :
आमदार विठ्ठलराव लंघे, पंचगंगा शुगर फॅक्टरी चे प्रभाकर शिंदे, भाजपा शहराध्यक्ष मनोजआण्णा पारखे, भाजपा नेते निरंजन डहाळे, ज्ञानेश्वर पेचे, सचिन देसरडा, तेजश्री लंघे, भाजपा मंडलाध्यक्ष प्रतापराव चिंधे, ऋषिकेश शेटे, रामभाऊ खंडाळे, उदय कुमार बल्लाळ, अजित नरुला सतीश आबा मुळे सर, अशोकराव टेकणे, राजेश कडू, आदिनाथ पठारे, मयुर वाखुरे, शोभा आलवणे, अमृता नळकांडे, डॉ. मनीषा वाघ आदींसह असंख्य नेवासकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या रॅलीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे तहसीलदार संजय बिरादार गटशिक्षणाधिकारी संजय लखवाल या शासकीय अधिकाऱ्याने देखील सहभाग घेतला.





