Merlin Ventana : ‘मर्लिन व्हेंटाना’ला ‘रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इअर’ पुरस्कार
Merlin Ventana : पुण्यातील बाणेर येथील मर्लिन व्हेंटाना प्रकल्पाला Realty+ West Real Estate Excellence Awards 2026 मध्ये ‘Residential Project of the Year’ पुरस्कार मिळाला.

Merlin Ventana : पुण्यातील बाणेर येथील मर्लिन भिंगारवाले डेव्हलपर्स एलएलपीच्या ‘मर्लिन व्हेंटाना’ या निवासी प्रकल्पाला १८ व्या Realty+ वेस्ट रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह अँड एक्सलन्स अवॉर्डस् २०२६ मध्ये ‘Residential Project of the Year’ पुरस्कार मिळाला.
मुंबईतील ताज सांताक्रूझ येथे बुधवार (९ सप्टेंबर) झालेल्या पुरस्कार सोहळ्यात रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासक, तज्ज्ञ आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
‘मर्लिन व्हेंटाना’ला मिळालेला हा पुरस्कार प्रकल्पाची आधुनिक रचना, जागतिक दर्जाचा दृष्टिकोन आणि लक्झरी सुविधांची दखल घेणारा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. केवळ दर्जेदार घरे उभारण्याऐवजी ग्राहकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.
या यशामध्ये मर्लिन भिंगारवाले डेव्हलपर्स एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मर्लिन ग्रुपचे व्यवस्थापकीय भागीदार कमलेश झवर भिंगारवाले यांच्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख करण्यात आला. प्रत्येक प्रकल्पातून गुणवत्ता आणि दर्जा उंचावण्याचा प्रयत्न असून, हा पुरस्कार भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल, अशी भावना भिंगारवाले यांनी व्यक्त केली. (Merlin Ventana)
१८ व्या Realty+ वेस्ट रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह अँड एक्सलन्स अवॉर्डस् २०२६चे आयोजन पश्चिम भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून करण्यात आले होते. यंदाच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ‘West 2035: The Next Decade of India’s Real Estate Leadership’ अशी होती. या वेळी ब्रँडेड निवासी प्रकल्प, लक्झरी जीवनशैली, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीच्या नव्या संधी, पुनर्विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रिअल इस्टेटमधील विपणन अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
‘Residential Project of the Year’ पुरस्कारामुळे लक्झरी निवासी प्रकल्पांच्या क्षेत्रात मर्लिन ग्रुपच्या कामाला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे.





