‘त्या’ कनिष्ठ लिपिकाच्या विरोधात व्यापारी आक्रमक; आमदार माधुरी मिसाळ यांना साकडे

मार्केट यार्ड (पुणे) : भुसार बाजारातील व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने आमदार माधुरी मिसाळ यांची भेट घेत बाजार समिती कनिष्ठ लिपिकाच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. कनिष्ठ लिपिकाची भुसार विभागप्रमुख व वाहन प्रवेश विभाग पदावरील नियुक्ती रद्द करण्याची मागणी व्यापार्यांनी केली. या प्रकरणी प्रशासकीय अधिकारी चालढकल करीत असल्याने व्यापार्यांनी पुढील कार्यवाहीबाबत आमदार मिसाळ यांच्याकडे साकडे घातले आहे. चौकशीचे आदेश असूनही संबंधीत कनिष्ठ लिपिकास भुसार विभाग प्रमुख पदावर ठेवण्याचा अट्टाहास बाजार समिती का करत आहे? असा प्रश्नही व्यापारी उपस्थित करीत आहेत.
व्यापार्यांना वेठीस धरून नाहक त्रास देऊ नये. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार विभाग प्रमुखाबाबत व्यापार्यांनी भेटून माझ्याकडे तक्रारी केल्या असून सदर प्रकरणी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी बोलून तातडीने कार्यवाही करण्यास सांगणार आहे.
– माधुरी मिसाळ, आमदारव्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असून दहशत केली जात आहे व्यापाऱ्यांची तक्रार असताना फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला भुसार प्रमुख पदा वर काम करण्यास नेमणे यातून बाजार समिती च्या कारभारावर प्रश्न निर्माण होतात. आम्ही भुसार व्यापाऱयांनी लेखी तक्रार केली असून चौकशी सुरू असताना प्रशांत गोते यांना त्या पदा वर ठेवण्याचा अट्टाहास कशा साठी आहे.
– प्रविण चोरबेले, माजी अध्यक्ष पुणे मर्चंट चेंबरमाझ्या विरोधात कोणत्याही भुसार व्यापार्याने लेखी तक्रार केलेली नाही, ज्यांनी तक्रार केलेली आहे, त्यांची विश्वासहर्ता तपासण्यात यावी. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करावी
– प्रशांत गोते, कनिष्ठ लिपिक, बाजार समिती





