Mercedes-Benz India Price Hike : मर्सिडीज बेंझ करणार दरवाढ, ‘या’ कारणांमुळे घेतला निर्णय…

Mercedes-Benz India Price Hike :- कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत, चलनवाढ जास्त पातळीवर आहे, कार्यचलन खर्च वाढला आहे, अशा परिस्थितीत मर्सिडीज बेंज कंपनीने भारतातील आपल्या सर्व वाहनांचे दर तीन टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही दरवाढ 1 जानेवारीपासून लागू होईल असे कंपनीने म्हटले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून कंपनीचा उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यातील ताळमेळ कमी झाला आहे. आतापर्यंत आम्ही दरवाढ टाळली होती. मात्र आता दरवाढ करावी लागणार आहे असे मर्सिडीज बेंज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष अय्यर यांनी सांगितले.
सध्या वितरकाकडे असलेल्या वाहनांना दरवाढ लागू होणार नाही. त्याचबरोबर 31 डिसेंबर 2024 पर्यंत बुकिंग करणार्या वाहनांना ही दरवाढ लागू होणार नाही. सध्या मर्सिडीज बेंझ कंपनीच्या वाहनाच्या किमती 45 लाख रुपये ते 3.6 कोटी रुपयांपर्यंत आहेत.




