HUID : 40 कोटीं सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्कींग पूर्ण; चौथ्या टप्प्याला 5 नोव्हेंबर पासून प्रारंभ…

नवी दिल्ली – देशात 40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे एचयुआयडी (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) पध्दतीने हॉलमार्किंग करण्यात आले आहे. आता भारतीय मानक ब्युरोने 5 नोव्हेंबर 2024 पासून सोने आणि सोन्याच्या दागिन्यांचे अनिवार्य हॉलमार्किंग करण्याचा चौथा टप्पा सुरू केला.
चौथ्या टप्प्यात, अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत 18 अतिरिक्त जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. चौथ्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर, अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत समाविष्ट होणार्या जिल्ह्यांची एकूण संख्या आता 361 झाली आहे.
भारत सरकारच्या सक्रिय उपाययोजनांमुळे दररोज 4 लाखांपेक्षा जास्त सोन्याच्या वस्तूंना विशिष्ट हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांकासह हॉलमार्क केले जात आहे, ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. अनिवार्य हॉलमार्किंगसाठी नव्याने 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यता आला आहे.
FADA | इन्व्हेंटरी आणखी कमी करण्याची गरज; वाहन वितरकांच्या संघटनेची कंपन्याकडे मागणी…
अनिवार्य हॉलमार्किंगची सुरुवात झाल्यापासून, नोंदणीकृत जवाहिर्यांची संख्या 34,647 वरून 1,94,039 पर्यंत वाढली आहे. यात पाचपटींहून अधिक इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, सोन्याची पारख करणे आणि हॉलमार्किंग करणार्या केंद्रांची (एएचसी) संख्या 945 वरून 1,622 पर्यंत वाढली आहे. बीआयएस केअर हे अॅप ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता, बीआयएस गुणवत्तेच्या चिन्हाचा गैरवापर आणि फसव्या जाहिरातींच्या तक्रारी दाखल करण्यास सक्षम बनवते. हे अॅप प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करता येते.





