पुण्याच्या वाहतूक कोंडीचा मर्सिडीज बेंझच्या सीईओंना फटका, दीड कोटीची कार सोडून रिक्षाने केला प्रवास

पुणे – मर्सिडीज-बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ मार्टिन श्वेंक (Martin Schwenk) यांची एक इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मार्टिन श्वेंक यांनी ऑटो रिक्षात प्रवास करतानाचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की,’त्याची एस-क्लास कार ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर त्यांनी ऑटो रिक्षाने प्रवास केला आहे’ यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
View this post on Instagram
सीईओची ही स्टाईल पाहून काही लोक त्याला डाउन टू अर्थ सांगत आहेत, तर काहीजण म्हणतात की,’आम्ही गाडीत बसून त्याची लक्झरी एन्जॉय केली असती.
इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत मार्टिन यांनी लिहिले की, ‘तुमचा एस-क्लास पुण्याच्या आलिशान रस्त्यांवर ट्रॅफिकमध्ये अडकला तर तुम्ही काय कराल? कदाचित गाडीतून उतरून काही किलोमीटर चालत जा आणि मग रिक्षा पकडून पुढे निघा..’ मार्टिन यांनी ऑटो राईडचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे लोक त्यांना ऑटोने प्रवास करण्याचा अनुभव विचारत आहेत.
श्वेंक हे 2018 पासून मर्सिडीज-बेंझ इंडियाचे सीईओ आहेत. याआधी त्यांनी मर्सिडीज-बेंझ चायना चे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले आहे. 2006 पासून या ब्रँडशी ते जोडले गेले आहे. एप्रिलमध्ये रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत श्वेंक म्हणाले की, ‘देशात डॉलर करोडपती (उच्च-उत्पन्न व्यावसायिक आणि तरुण उद्योजक) आहेत. त्यांची संख्या वाढत आहे.’





