Men’s Junior Asia Cup 2024 : गतविजेत्या भारताने पुरुष कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत मंगळवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाचा 3-1 असा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
🏆FINAL SHOWDOWN: INDIA VS PAKISTAN 🇮🇳🇵🇰
It’s the clash of the titans as Team India takes on Pakistan in an epic final.
The stage is set, the energy is electric, and the arch-rivals are ready to battle it out for glory.Every pass, every goal, every moment counts.
🗓4th… pic.twitter.com/lDGNab1VJz
— Hockey India (@TheHockeyIndia) December 4, 2024
स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या भारताने दिलराज सिंग (10वे मिनिट), रोहित (45वे मिनिट) आणि शारदा नंद तिवारी (52वे मिनिट) यांच्या गोलच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.
मलेशियाकडून एकमेव गोल अझीमुद्दीन कमरुद्दीनने 57व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर केला. बुधवारी म्हणजेच आज रात्री 8.30 वाजता अंतिम फेरीत भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानने पहिल्या सेमीफायनलमध्ये जपानचा 4-2 असा पराभव करताना आगेकूच केली.
भारत पाचव्या विजेतेपदाच्या उंबरठ्यावर….
भारत चार विजेतेपदांसह (2004, 2008, 2015, 2023)ज्युनियर आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ राहिलेला आहे. दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी याच स्पर्धेतून संघ पात्र ठरतील. ज्याचे आयोजन भारत करणार आहे. अव्वल सहा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील परंतु भारताने यजमान म्हणून आधीच आपले स्थान निश्चित केले आहे, त्यामुळे सातव्या क्रमांकाचा संघ देखील पात्र ठरेल.