IND vs PAK : मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान ‘महायुद्ध’! विश्वचषकाच्या एकाच ग्रुपमध्ये मिळालं स्थान
IND vs PAK : पुरुष गटात भारताला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत पूल-डी मध्ये ठेवण्यात आले आहे.

IND vs PAK FIH Hockey World Cup 2026 : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान होणाऱ्या विश्वचषकासाठी ड्रॉ जाहीर केला आहे. १७ मार्च रोजी अॅमस्टरडॅम येथील वैगेनर स्टेडियमवर पार पडलेल्या या कार्यक्रमात भारतीय पुरुष आणि महिला संघांचे प्रतिस्पर्धी स्पष्ट झाले आहेत. विशेष म्हणजे, पुरुष गटात भारताला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत पूल-डी मध्ये ठेवण्यात आले आहे.
पुरुष गट: भारत विरुद्ध पाकिस्तान ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा –
पूल-डी मध्ये भारत आणि पाकिस्तानसह इंग्लंड आणि वेल्स या संघांचा समावेश आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत ५ वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये भारताने ३ वेळा तर पाकिस्तानने २ वेळा विजय मिळवला आहे. २०१० नंतर तब्बल १६ वर्षांनी हे दोन्ही संघ विश्वचषकाच्या रणांगणात एकमेकांसमोर उभे ठाकतील. भारतीय संघ आपले सर्व सामने नेदरलँड्समध्ये खेळणार आहे.
महिला गट: भारताचे कठीण आव्हान –
Pakistan and India are set to face off in a highly anticipated clash at the Hockey World Cup 2026, reigniting one of the biggest rivalries in world hockey and promising an intense showdown on the global stage.#PakistanVsIndia #HockeyWorldCup #Hockey2026 #PakistanHockey pic.twitter.com/kOXNDQK3Nw
— Vok Sports (@voksports) March 18, 2026
भारतीय महिला हॉकी संघानेही या मेगा टूर्नामेंटसाठी पात्रता सिद्ध केली असून, त्यांना पूल-डी मध्ये स्थान मिळाले आहे. भारतासमोर या गटात चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांचे आव्हान असणार आहे.
हॉकी विश्वचषक २०२६: पुरुष आणि महिलांचे गट –
| पुरुष गट (Pools) | संघ |
| पूल A | नेदरलँड्स, अर्जेंटिना, न्यूझीलंड, जपान |
| पूल B | बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, मलेशिया |
| पूल C | ऑस्ट्रेलिया, स्पेन, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका |
| पूल D | इंग्लंड, भारत, पाकिस्तान, वेल्स |





