Men’s Junior Asia Cup 2024 (Muscat, Oman) : – अगोदरच उपांत्य फेरी गाठलेल्या गतविजेत्या भारतीय संघानं रविवारी पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियाचा 8-1 असा पराभव केला. अर्शदीप सिंगने या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवताना विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. यासह भारताचे चार विजयानंतर 12 गुण झाले असून ‘अ’ गटात गुणतालिकेत संघानं अव्वल स्थान पटकावले आहे.
सामन्यात अर्शदीपने नवव्या, 44व्या आणि 60व्या मिनिटाला असे तीन तर अररजितसिंग हुंदलने (3 ऱ्या आणि 37व्या मिनिटाला) दोन गोल केले. संघाच्या शेवटच्या पूल सामन्यात गुरजोत सिंग (11व्या), रोशन कुजूर (27व्या) आणि रोहित (30व्या) यांनी प्रत्येकी एक गोल केला. कोरियासाठी एकमेव गोल किम ताहेयॉनने 18 व्या मिनिटाला केला. या सामन्यात भारताला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यापैकी दोनचे गोलमध्ये रूपांतर झाले. तर कोरियाला एकमेव पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र ते त्याचे गोलमध्ये रूपांतर करू शकले नाही.
India finish the group stage at Jr. Men’s Asia Cup here in Oman, Muscat with yet another goal-feast win against Korea.
Hattrick from Arshdeep Singh and a brace from Araijeet Singh Hundal laid the foundation to this solid win.
Next up, it’s time for a Semi-Final clash with… pic.twitter.com/XkZRID29E5
— Hockey India (@TheHockeyIndia) December 1, 2024
अशा होणार उपांत्य फेरीच्या लढती….
मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ब-गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ मलेशियाशी होईल, ज्याने चार सामन्यांतून सात गुण मिळवले आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात मलेशियाचा 4-1 असा पराभव करणारा पाकिस्तान आपले चारही सामने जिंकून 12 गुणांसह ब-गटात अव्वल स्थानावर आहे आणि आता मंगळवारी दुसऱ्या उपांत्य फेरीत त्याचा सामना जपानशी होईल. जपानच्या संघाचे (तीन विजय आणि एका पराभव) नऊ गुण झाले असून ते गुतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. भारतानंतर ‘अ’ गटामधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा जपान दुसरा संघ आहे.
IPL 2025 : अजिंक्य रहाणे होणार KKRचा पुढचा कर्णधार? आयपीएल 2025 च्या आधी मोठी अपडेट आली समोर…
भारत चार विजेतेपदांसह (2004, 2008, 2015, 2023)ज्युनियर आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ राहिलेला आहे. दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी याच स्पर्धेतून संघ पात्र ठरतील. ज्याचे आयोजन भारत करणार आहे. अव्वल सहा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील परंतु भारताने यजमान म्हणून आधीच आपले स्थान निश्चित केले आहे, त्यामुळे सातव्या क्रमांकाचा संघ देखील पात्र ठरेल.