Sachin Supriya video : सपने में मिलती है…! गाण्यावर सचिन-सुप्रिया पिळगावकर यांनी धरला ठेका; व्हिडीओ पाहा…

Sachin Supriya video : मराठी-हिंदी सिनेमसृष्टीतील सुदंर जोडी म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जोडी ओळखली जाते. दोघांनी मराठीतील काही सिनेमात एकत्रित काम केलं आहे. सुप्रिया पिळगावकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी इन्स्टाग्रामवर अभिनेते सचिन पिळगावकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय दोघांचा एकत्रित सपने में मिलते है गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
*तुझ पे कुर्बान मेरी जान, सचिन पिळगावकरांचा पत्नी सुप्रियासोबत भन्नाट डान्स, वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन* pic.twitter.com/aUESvK73np
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) August 17, 2025
सचिन यांनी सुप्रिया पिळगावकर यांच्यासाठी तुझ पे कुर्बान मेरी जान, मेरी जानHappy birthday to my Super Love you so much अस कॅप्शन फोटोखाली दिलं आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत सुप्रिया पिळगावकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक म्हणून लोकप्रिय आहेत. या पोस्टमधून सचिन पिळगावकर यांनी आपल्या पत्नीविषयी प्रेम व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण बालकलाकर म्हणून केली. हळूहळू त्यांनी सिनेमात मुख्य भूमिकेत काम करायला सुरूवात केली. त्यानंतरच्या काळात अशोक लक्ष्या आणि सचिन या त्रिकूटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तर सुप्रिया पिळगावकर यांची ओळख नवरी मिळे नवऱ्याला सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.
हेही वाचा :‘तेरा जैसा यार कहा’ गाणं गायलं अन् तहसीलदार निलंबित; व्हायरल व्हिडिओने खळबळ





